लवकर लग्न न ठरण्याची काही कारणे

  • एखादे स्थळ चालून आले आहे. त्वरित प्रतिसाद देणे
  • स्थळ पाहून झाल्यावर  स्वतः काही कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहणे.

  • सगळं जुळत असतानाही ह्याही पेक्षा आणखी कुठं चांगल स्थळ असेल कां? हा शोध चालू ठेवणे.

  • प्रत्यक्ष मुलगा / मुलगी पाहाता फोटोवरून  रंग,चेहरा,बांधा,  स्वभाव ह्याचा ( खोटा )अंदाज बांधणे.

  • मुलगी पाहाणे ह्या कार्यक्रमाचे वेळी मुलगा मुलीस  आपसात संवाद साधणेसाठी किमान  दहा मिनीटे तरी वेळ देण्यास टाळाटाळ करणे.

  • मुला / मुलीच वय अधिक वाढलं तरी  बिनधास्तपणे ," असतात ,मिळतात अशी सुद्धा  स्थळं "असं म्हणत राहाणं. (विवाहात वयाला  महत्व असते. बाकी सर्व गौण).

  • करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणं

  • वय वाढतं, सौंदर्य घसरू लागते. तब्बेत पसरू लागते.किंवा घटू लागते. वय वाढल्यावर काहीही पत्करण्या पेक्षा योग्य वेळेत निर्णय घ्यावा

  • पत्रिका पाहाताना खूप खौलात शिरणे. चांगलं भरपूर असलं तरी थोडं दोषाचं दिसताच इतर  ठिकाणी पत्रिका तपासता  पटकन नकार देणं.आता सगळ्यानां सगळे ग्रह विशेषतः मंगळ कळायला लागलाय.पालकांच्या लग्नावेळी असं होत कां? जन्म तारखा खऱ्या होत्या कां?  

  • विवाह ठरत आला असतानाच कुठून तरी काहींतरी विपरित किंवा अफवा कळताच त्या बाजूच्या माणसांना भेटून खरं खोटं शहानिशा नकरताच पटकन नकार देणे.



Friends, If You like this post, kindly comment below the post and do share your response. Thanks for reading :)

Comments

Post a Comment

JeevanSangini News Gallery

You'll get updates on what’s new JeevanSangini....